
लोहा, प्रतिनिधी(शिवराज पवार)
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या तमाम पत्रकार बांधवांना आज लोहा बसस्थानकात 6 जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांचा पुष्पहार,पेन देवून, पेढा भरवून सत्कार करण्यात आला.
पत्रकार दिनानिमित्त लोहा येथे राजर्षी शाहू शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा धावरीचे मुख्याध्यापक बी.वाय.चव्हाण, बहुजन प्रेरक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष पी.आर. चिखलभोसीकर, प्रताप पाटील चिखलीकर कट्टर समर्थक पारडीचे पॅनल प्रमुख माधव पाटील पवार पार्डीकर, लोकमंगल को-ऑप क्रेडिट सोसायटी शाखा लोहा च्या वतीने केले. ‘दर्पण’ दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या तमाम पत्रकार बांधवांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचे सत्कार्य आज घडून आल्याचे प्रेरक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष पि.आर.चिखलभोसीकर यांनी मत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना माजी चेअरमन चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की 6 जानेवारी 832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली, दर्पण नावाचे प्रथम वर्तमानपत्र काढून समाजातील सामान्यांना न्याय मिळवून दिला. त्याचबरोबर दैनिक केसरी चे लोकमान्य टिळक,आचार्य प्र.के. अत्रे यांचे मराठा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘जनता’ ‘प्रबुद्ध ‘भारत’ ‘मूकनायक’ या वर्तमानपत्रांनी केलेले कार्य यांची प्रेरणा आजच्या पत्रकारांनी घेऊन आपले कार्य करावे, समाजातील विविध प्रश्नावर आपली लेखणी निर्भिडपणे चालवावी असे प्रतिपादन बि.वाय. चव्हाण यांनी केले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
लोहा येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे, डी एन कांबळे, विनोद महाबळे शिवराज पा.पवार बाळासाहेब बुद्धे, तुकाराम दाढेल सह पत्रकार उपस्थित होते.
याप्रसंगी मराठी पत्रकार संघाचे माजी लोहा तालुकाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे, विजयकुमार चन्नावार, रत्नाकर महाबळे, शेख अहमद, माजी तालुकाध्यक्ष केशव पा.पवार, बाळासाहेब कतुरे,शेख इमाम लदाफ, विलास सावळे,युनूस शेख, गोविंद पा. कदम,श्याम पा.नळगे, बाळासाहेब बुद्धे प्रवीण महाबळे, संजय रहाटकर,शिवराज पा. पवार, संतोष चेऊलवार आदींसह पत्रकारांची उपस्थिती होती.