Categories
सातारा

पुणे-बंगलोर महामार्गावर बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी अवस्थेत .

प्रतिनिधी मयूर जाधव‌ कराड.

मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास पाचवड फाटा येथे पुणे-बंगलोर महामार्गावर बिबट्या बसल्याच्या आढळल्याने आसपासच्या परिसरात खळबळ उडाली पाचवड येथील जेके पेट्रोल पंपासमोर घटना घडली आहे्
सुमारे अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ त्यांनी रस्त्यावर ठाण मांडला होता त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. आगाशिव येथील लेण्यातील सुरक्षारक्षक निघाले असता त्यांच्या ची गोष्ट लक्षात आली व त्यांनी लगेच वनविभागाला माहिती दिली . वनविभागाचे अधिकारी तिथे पोहोचेपर्यंत वाढलेली गर्दी व वाहनांच्या आवाजामुळे त्याने बाजूच्या उसात धूम ठोकली. मात्र काही वेळातच तिथे वनविभागाचे कर्मचारी पिंजर्यासह पोहोचले. त्यावेळी वनपाल.मा. ए.पी .सव्वाखंडे. वनरक्षक मा.मंगेश वंजारी. वनरक्षक रमेश जाधव ‌वनरक्षक प्रशांत मोहिते वनरक्षक उत्तम पांढरे. सचिन खंडागळे. धनाजी गावडे व भाऊसाहेब नलवडे उपस्थित होते. त्यांच्यासोबत पर्यावरण अभ्यासक रोहन भाटे हे उपस्थित होते. मंगळवारी रात्रभर पाचवड फाटा. नांदलापुर. महामार्गालगत चा परिसर त्यांनी शोध मोहीम राबवली. उसात गडाच्या कडेला शोध घेण्याचे काम बुधवारी सकाळपर्यंत सुरू होते. त्या ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले .मात्र दिसला नाही. त्याचप्रमाणे शोधमोहीम चालू आहे.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started