मुरुम, ता.२ (प्रतिनिधी) : येथील नगर परिषदेचे नुतन उपनगराध्यक्ष म्हणून सहदेव गायकवाड यांची निवड झाल्याने शनिवार (ता.२) रोजी विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, मुरुम येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरणाप्पा गायकवाड, माजी नगरसेवक चंद्रकांत गोडबोले, आनंदनगरचे सरपंच उमेश सोनकांबळे, प्रा.आण्णाराव सोनकांबळे, आर. के. गायकवाड, किरण गायकवाड, विजय कांबळे, प्रणित गायकवाड, सुरज कांबळे, प्रशांत मुरुमकर, उत्कर्ष गायकवाड, संतोष कांबळे आदि उपस्थित होते.
Categories
बसवराज पाटील यांच्या हस्ते नुतन उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड यांचा सत्कार