

कागल■गोरख कांबळे.
कागल तालुक्यातील होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीचे प्रशिक्षण आज राज्य निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार शिल्पा ठोकडे व नायब तहसीलदार शिवाजी गवळी यांनी कर्मचाऱ्यांना दिले.कागल तालुक्यातील ५५ गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान प्रक्रियेचे प्रत्यक्ष कामकाज ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया याविषयी प्रशिक्षण दिले.निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष कामकाज कसे करावे? याविषयीची माहिती देण्यात आली. कागल तालुक्यात ५५ गावातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून आज कागल तालुक्यातील ५५ गावातील ग्रामपंचायत निवडणूकीत मतदान केंद्रावर कामकाज पहाणारे केंद्राध्यक्ष, सहाय्यक कर्मचारी, मतदान अधिकारी क्रमांक १ व मतदान अधिकार क्रमांक 2 व 3 अशा सर्व लोकांना प्रशिक्षण आरटीओ गोदाम नवीन पोस्ट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पश्चिम बाजू कागल येथे देण्यात आले.
या प्रशिक्षणात प्रत्यक्ष मतदान केंद्रावर आदर्श आचारसंहिता नियमांचे पालन,मतदान यंत्र हाताळणी, व मतदान यंत्राची प्राथमिक माहिती,तसेच कोरोना संसर्ग काळात घ्यावयाची काळजी यासह मतदान प्रक्रियेबाबत मोठ्या पडद्यावर चलचित्र दाखवून मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ या दोन सत्रात देण्यात आले. पुढील प्रशिक्षण शनिवार दि.९ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. सदर प्रशिक्षणास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इतर सर्व प्रशिक्षणार्थी व कागल तहसील कार्यालय,व कागल नगरपरिषद कार्यालयातील नियुक्त कर्मचारी उपस्थित होते.