नांदेड जिल्हा प्रतिनिधी उद्धव मामडे रावधानोरकर
नांदेड मुखेड – अखिल भारतीय ब.ओ.बि.सी.अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनची बैठक मराठवाडा अध्यक्ष राजु पाटील सुरनर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. त्या बैठकीत महाराष्ट्रात समितीचे मजबूत संघटन करून त्यांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी समितीच्यावतीने नूतन जिल्हाउपाध्यक्ष पदी निवडण्यात आली.या बैठकीत अखिल भारतीय ब.ओ.बि.सी.अ. भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन नांदेड जिल्हाउपाध्यक्ष पदी येवती येथील सामाजिक कार्यकर्ते मारोती हिरमलवाड यांची निवड केल्याचे मराठवाडा अध्यक्ष यांनी जाहीर केले. तसे निवडीचे पत्र मराठवाडा अध्यक्ष राजु पाटील सुरनर यांच्या हस्ते मारोती हिरमलवाड यांना देण्यात आले. यावेळी बोलताना मारोती हिरमलवाड यांनी समितिचे कार्य सर्वदूर पोहचविण्यासाठी व विशेष करून पीडित वर्गांच्या न्याय हक्कासाठी काम करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले आणि संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले.
सोबत मराठवाडा युवा अध्यक्ष उद्धव मामडे रावधानोकर,मराठवाडा उपाध्यक्ष आरीफ शेख निमटेकर,चंद्रकांत नागेश्वर,गोविंद माधवराव कांबळे,राजु लक्ष्मण हिरमलवाड,व्यंकटेश मनोहर घुमावार,अजय शंकरराव नागरगोजे,माधव संतुका येवते,रोहिदास माधवराव येवते,अविनाश हणमंत कांबळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
Categories
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बहुजन ओ बी सी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन पदी राजू पाटिल सुरनर यांच्या हस्ते मारोती इरबा हिरमलाड यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड!!