Categories
सातारा

लोणंदमध्ये श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांचा कौतुक सोहळा संपन्न

सातारा,खंडाळा तालुका प्रतिनिधी/ मंगेश माने

लोणंद -ता.खंडाळा येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या वतीने महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसुबाई शिखरावर तिरंग्यातुन महाराष्ट्राचा नकाशा साकारत शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती.तसेच मालवण – तारकर्लीच्या अरबी समुद्रात ३२१ फुट तिरंगा फडकावित विजय दिवस साजरा करण्यात आला होता.या दोन्ही उपक्रमाने लोणंदचे नाव हे चांगले प्रकाशझोतात आलेले आहे.या ग्रुपने ऐतिहासिक अशीच कामगिरी केल्याने ग्रुपवर कौतुकांचा वर्षाव होतो आहे.
यांमध्ये सहभागी झालेल्या भैरवनाथ डॉगर ग्रुपच्या सर्व सदस्यांचा सन्मान व कौतुक सोहळा हा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असताना यावेळी अ‍ॅड.बाळासाहेब बागवान,माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील, मुख्याधिकारी हेमंत ढोकले, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी,
नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील,विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे,माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके-पाटील
नगरसेवक हणमंतराव शेळके पाटील,नगरसेवक विकास केदारी, डॉ.मकरंद डोंबाळे, रमेश अण्णा कर्णवर,
सुरेश जाडकर, भिकू दादा कुरणे, राहुल घाडगे,शामसुंदर डोईफोडे, रवींद्र क्षीरसागर ,विश्वासराव शिरतोडे,
डॉ.नितीन सावंत, विश्वनाथ शानभाग, प्रवीण चांदवडकर
डॉ.देशमुखे, विठ्ठल टेंगळे, लोणंद फौंडेशनचे अध्यक्ष
दयानंद खरात, विनय रावखंडे, मस्कु अण्णा शेळके पाटील, साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला,
संतोष जाधव, भगवान घाडगे,भरत बोडके,दीपक बाटे
सुनील शहा आदींसह इतर मान्यवर व डोंगर मॉर्निंग ग्रुपचे सदस्य, लोणंद रनर्स ग्रुप सदस्य तसेच सातारा
सॅटरडे ट्रेकरर्सचे सदस्य उपस्थित होते.

डोंगर ग्रुपच्या उपक्रमाचे विशेष कौतुक करताना सपोनि संतोष चौधरी यांनी भैरवनाथ डोंगर ग्रुपची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.डोंगरावर वृक्ष संवर्धन करण्याचा मानस ग्रुपकडुन चांगल्या प्रकारे जपला जात आहे.डोंगर ग्रुपच्या वतीने डोंगरावर झाडे लावली जात आहेत.परंतु काही विघ्नसंतोषी लोकांकडून चुकीचे प्रकार केले जात आहेत.वणवा लावण्याचे प्रकार थांबले पाहिजेत.अशा प्रतिक्रिया यावेळी देण्यात आल्या.उपक्रमात सहभागी असलेले लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या तसेच वैयक्तिक रित्या विशेष कामगिरी पार पाडलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.यावेळी काही मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी ग्रुप सह ग्रुपचे संस्थापक शशिकांत जाधव आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे उपक्रम पार पडले ते एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांचे ही विशेष कौतुक करण्यात आले.तसेच शंभूराज भोसले, तानाजीराव धायगुडे, डॉ.अविनाश शेळके,संभव शहा यांनी मोहिमेतील स्वतःचे अनुभव सांगितले.यावेळी सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक हेमंत निंबाळकर यांनी केले.सूत्रसंचालन राजेंद्र काकडे आणि हनुमंत बोराटे यांनी केले.तर आभार प्रदर्शन संदीप शेळके यांनी मानले.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started