परळी (प्रतिनिधी)
परळी वै. येथील जिजामाता उद्यानाचे सुशोभिकरण चालू आहे. गार्डन मध्ये पूर्वी जिजाऊंचा पूर्णाकृती पुतळा महाद्वाराच्या समोर होता. पण आता महाद्वाराची दिशा बदलण्यात आली असून आऊसाहेब जिजाऊ यांचा पुतळा सुद्धा मुख्य प्रवेशद्वारावर बसवण्यात यावा. पुतळ्याची जागा बदलत असताना पूर्वीचा एकट्या जिजाऊचा पूर्णाकृती पुतळा न बसता बालशिवबा सोबत जिजाऊंचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपरिषदेला निवेदन देऊन करण्यात आली आहे. तसेच सध्या उद्यानात सुशोभीकरणाचे काम चालू असल्यामुळे काळजी म्हणून जिजाऊंचा पुतळा सुशोभीकरणाचे काम होईपर्यंत झाकण्यात यावा. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन परळी वै. नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक शिवश्री संतोष रोडे साहेब यांना देताना संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव माहिती अधिकार संरक्षण समिती बीड जिल्हाध्यक्ष शिवश्री बादल कांबळे सामाजिक कार्यकर्ते शिवश्री पवन माने आदी उपस्थित होते.
Categories
जिजामाता उद्यानाचे सुशोभीकरणाचे काम संपेपर्यंत राजमाता जिजाऊंचा पुतळा झाकण्यात यावासंभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपरिषद ला निवेदन