भोकर प्रतिनिधी दत्ता बोईनवाड
भोकर येथील एका महिलेच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष डाॅ. फेरोज खान इनामदार यांच्या विरुद्ध भोकर पोलिसात विनयभंग व मारहाण केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भोकर येथील एका महिलाने दिलेल्या फिर्यादीवरून 28 डिसेंबर 2020 रोजी रेल्वे स्टेशन रोड डॉक्टर इनामदार यांच्या दवाखान्यात दुपारी चारच्या दरम्यान केली असता माझ्या सासर्याच्या जमिनीवर आपण अतिक्रमण केले आहे म्हणून डॉक्टर फिरोज इनामदार यांना जाब विचारला.यावेळी डॉक्टर फिरोज इनामदार यांनी महिलेशी अश्लील शिवीगाळ करून हात धरून मारहाण केली व मी इनामदारआहे.या गावात माझी खूप जमीन आहे तुला काय करायचे ते करून घे म्हणून दवाखान्या बाहेर हाकलून दिले असी फिर्याद सुचिता मनोजकुमार शिवेवार पोलिसात दिली यावरून डॉक्टर फिरोज खान इनामदार यांच्याविरुद्ध भोकर पोलिसात कलम 354. 294. 323. 509. विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास जमादार रंगराव जाधव करीत आहे.
Categories
भोकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष डाॅ. फिरोज खान इनामदार यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल.