Categories
शिरसगाव

विद्यार्थ्यांना पुस्तके भेट अन्  बौध्दीक मेजवानी , अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम


श्रीगोंदा ( हिंदुसमाट शिरसगाव बोडखा प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )

श्रीगोंदा ; स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून यशाचे शिखर सर करण्यासाठी अग्नीपंख फौंडेशनने विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट दिली आणि अप्पर तहसीलदार चारुशीला पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या व्याख्यानाच्या बौद्धीक मेजवानीने कार्यक्रम रंगला अध्यक्षस्थानी पांडुरंग खेतमाळीस होते.

 अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांनी आपल्या जीवनातील यशाचे पैलू उलगडताना स्पर्धा परीक्षा देताना  अभ्यासक्रम कोणता आहे! त्यासाठी चांगल्या लेखकांच्या पुस्तकांची निवड करावी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम यावे नक्कीच यश मिळेल. 

दिलीप तेजनकर म्हणाले की मी  तुम्हाला काय व्हायचे एकदा ठरवून त्या दिशेने मार्गक्रमण सुरू करा चुका सुधारत चला जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत हिम्मत सोडू नका. 

यावेळी  पांडुरंग खेतमाळीस प्रशांत गोरे विजया घावटे प्रा.  प्रांजल कुलकर्णी प्रतिभा रसाळ विशाल चव्हाण यांची भाषणे झाली  प्रास्ताविक प्रा. संजय लाकुडझोडे यांनी केले. 

यावेळी विठोबा निंबाळकर संगीता तनपुरे मच्छिंद्र सुपेकर  संतोष धुमाळ  उद्धव खामकर  किरण ढवळे  अरविंद कापसे प्रशांत भोसले पोपट जाधव  बापुराव ढवळे शरद मचाले बजरंग नेटके पांडुरंग शेलार  डॉ अरुण रोडे सुरेखा शेंद्रे शुभांगी लगड बबन गोरे अंकुश घाडगे मधुकर काळाणे किसन वऱ्हाडे उपस्थित होते. 

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started