बिद्री ( प्रतिनिधी ) : येथील दूधसाखर विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयचे कलाशिक्षक सुनिल भाऊसो खोत यांना दौंड (जि. पुणे) येथील ज्ञान संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय गुणवंत गुरुगौरव शिक्षणरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन व माजी आमदार रमेशआप्पा थोरात यांच्या हस्ते आणि तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष आप्पासाहेब पवार, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष सोहेल शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेली वीस वर्षे कलाशिक्षक म्हणून सेवेत असलेले सुनील खोत यांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांनी कला विषयावरील शासकीय ( एलेमेंटरी व इंटरमिजीएट) ग्रेड परीक्षेस उपयुक्त पुस्तकाची निर्मिती केली आहे.कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत श्री. खोत यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यास शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे, ज्ञानसंकल्प संस्थेचे अध्यक्ष सदाशिव रणदिवे, उपाध्यक्ष सुभाष भोसले, प्रदेश उपाध्यक्ष रोहिणी पवार , कोजिमाशिचे संचालक प्रा.हिंदूराव पाटील, मनसे तालुकाध्यक्ष सचिन कुलथे, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक दोरगे उत्तम कागले आदी मान्यवर उपस्थित होते.
Categories
सुनील खोत यांना शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान