Categories
कोल्हापूर हातकणंगले

कै.संभाजीराव माने स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन भव्य वक्तृत्व स्पर्धा

प्रशांत भोसले

रुकडी ( दि.२५-१२-२०२० ) येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय आणि रोटरी क्लब आॕफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने कै.संभाजीराव माने स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा गुरुवार दिनांक ७ जानेवारी २०२१ रोजी सकाळी नऊ वा. रुकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केली आहे.या स्पर्धेतील विषय पुढील प्रमाणे १. आण्णाभाऊ साठेः साहित्य आणि समाजकार्य 2.कोव्हीड १९ आणि भारतीय अर्थव्यवस्था ३. कुस्तीतील ध्रुवताराः हिंदकेसरी श्रीपतराव खंचनाळे ४.नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ५. गुगल-एक वैश्विक महागुरू असे स्पर्धेसाठी विषय असून प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये ५०००/-, प्रमाणपत्र व कै.संभाजीराव माने स्मरणार्थ कायमस्वरूपी ट्राॕफी द्वितीय क्रमांक रोख रुपये ३००० व प्रमाणपत्र तृतीय क्रमांक रोख रुपये २०००/- व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ रोख रुपये १००० व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत, तरी ज्युनियर सिनियर व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे व स्पर्धा समन्वयक प्रशांत कांबळे यांनी केले आहे

अधिक माहितीसाठी 77 75 98 96 77 भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started