Categories
राहुरी

राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत उमेदवारांची धावपळ

निवडणूकीसाठी लागणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळवी

राहुरी तालुका प्रतिनिधी
( जावेद शेख ) 28 डिसे

राहुरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठीचा अर्ज भरण्याची कालवधी कमी असल्याने उमेदवार निवडणुकीसाठी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्र काढण्यासाठी धावपळ करीत असल्यांचे चित्र तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसून येत आहे.
तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूकाचे रंगधुमाळी सुरु झाले असुन या ग्रामपंचायतील सरपंच पदाचे आरक्षण ही जिल्हाधिकारी यांच्या सुचणेनुसार सोडण्यात आले होते. पण शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घोडे बाजार होऊ नये म्हणून सोडलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश देऊन सदरील आरक्षण हे निवडणुकीच्या नंतर सोडणार असल्याने इच्छुक उमेदवारांचे हिरमोड झाले असल्याने निवडणूकीत इच्छुक उमेदवारांचा खर्च व निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे यांची जुळवाजुळवी करणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाल्याने उमेदवारांना लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी विलंब झाला असून आत्ता निवडणूकीसाठीचा अर्ज स्वीकारण्याची तारीख जवळ येताच उमेदवारांची पळापळी करून कागदपत्राची जुळवाजुळवी करीत आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि. २३ डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत यात प्रत्येक गावातील इच्छुक उमेदवार आपले भवितव्य शोधण्यासाठी धावपळ धावपळ करून निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी जिवाचा आटापिटा करतांना दिसून येत आहे.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started