Categories
नांदेड

बाभळी बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर

गेट क्रमांक आठच्या बेसमेंट मधून पाण्याचा प्रवाह चालू सुरक्षा बांधलाही भयंकर भेगा
भविष्यात दुर्घटना होण्याचे संकेत

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.28.धर्माबाद आंध्र प्रदेश व महाराष्ट्राच्या वादाने ढवळून निघालेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या अटी नियमाच्या अधीन राहून पूर्णत्वास गेलेल्या बाभळी बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत असून, गेट क्रमांक आठच्या पायालाच मोठे भगदाड पडल्यामुळे तेथून गेट बंद असतानाही खालच्या बाजूने पाण्याचा मोठा प्रवाह चालू असल्याचे चित्र असून, सुरक्षा बांधलाही फार मोठ्या भेगा पडल्यामुळे भविष्यात फार मोठी दुर्घटना घडली घडण्याचे संकेत मिळत असून या बाबीकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज जाणकार बोलून दाखवत आहेत. बाभळी बंधारा हा महाराष्ट्र व तत्कालीन आंध्र प्रदेश व सद्यस्थितीत तेलंगाना सीमेपासून अवघ्या सात किलो मीटर आत महाराष्ट्राच्या सीमेत धर्माबाद तालुक्यातील बाबळी येथे बांधण्यात आला. बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याची क्षमता केवळ दोन पॉईंट 74 अब्ज घनफूट आहे.यावर्षी पावसाळ्यात मुबलक पाऊस पडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 28 ऑक्टोबर पासून बाभळी बंधाऱ्याचे गेट लावण्यात आल्यामुळे मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे.बाभळी बंधाऱ्याचे सभोवताली अगदी नयनरम्य चित्र दिसत असले तरी गेट क्रमांक आठच्या पायथ्याशी मोठे भगदाड पडले असून तेथून पाण्याचा प्रवाहात चालू आहे. हे भगदाड भविष्यात उग्र रूप धारण केले तर बाभळी बंधारा दुर्घटनेच्या स्वरूपात समोर येण्याची शक्यता असून बाबळी बंधाऱ्याच्या सुरक्षा बांधालाच भयंकर भेगा पडल्या असून त्या भागांची खोली जवळपास तीन फुटापर्यंत पोहोचल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसत आहे. भविष्यात ही खोली जर वाढली तर हा बांध तुटून सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील दुर्घटने प्रमाणे बंधाऱ्या खालील गावांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत बाबळी बंधाऱ्यावर कोणताही सक्षम अधिकारी दररोज उपस्थित नसल्याचे चित्र असून, फक्त एक डे-नाईट वाचमेन बाभळी बंधाऱ्याची अल्प मानधनावर सुरक्षा करीत असल्याचेही चित्र आहे. चौकट बाभळी बंधाऱ्याच्या डागडुजीसाठी प्रतिवर्षी किमान दहा लक्ष रुपये खर्च राखीव असून तो खर्च होतो किंवा नाही या गोष्टीकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे बंधाऱ्याच्या सुरक्षा बांधाच्या बाजूने काटेरी कुंपण झाडे-झुडपे प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्या झाडांच्या मुळ्या बांधात घुसून नुकसान पोहोचत आहेत उपरोक्त पृष्ठभूमीवर भविष्यातील दुर्घटना टाळावयाची असल्यास संबंधित प्रशासनाने बाभळी बंधाऱ्याची सद्यस्थिती काय आहे यासंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमून बाभळी बंधाऱ्याच्या सुरक्षेविषयी अभ्यासपूर्ण अंदाज घेणे गरजेचे आहे.
यासंदर्भात बाभळी बंधारा प्रकल्पचे उपविभागीय अभियंता अनिल पडवळ यांना भ्रम्नधव्नीवरून विचार पुस केल्यास म्हणाले की,बंधाऱ्यात असलेल्या पाण्याची गळती होऊनये,यासाठी प्लाटमध्ये रबर सील बसविलेले असते,सदरील रबर सील मधून पाणी प्लाट मध्ये पडत आहे.पाण्याची पातळी त्या बाजूला जास्त असल्यामुळे सदरील ठिकाणी पाण्याची गळती रबर सील मधून होत असले. परंतु बंधाऱ्याला कुठलेच भेगा पडलेले नाहीत.व बंधाऱ्यांच्या देखरेख ठेवण्यासाठी कुलीच निधी वर्षाकाठी आलेली नाही.उलट बंधाऱ्यावरील संबंधित अभियंताची पोस्टींग दुसरीकडे करण्यात आली आहे.सध्या बंधाऱ्याच्या देखभालीसाठी दोन कर्मचारी आहेत.परंतू ते दोन्ही कर्मचारी सध्या पाणीपट्टी वसुली करण्यासाठी फिरत असल्याचे अनिल पडवळ यांनी बोलताना सांगितले आहे.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started