Categories
अजब गजब कोल्हापूर

देवकी देवी तुम्हाला सांष्टाग दंडवतच

  • कोल्हापूर- सुभाष भोसले
    श्रीम देवकीदेवी हुकूमसिंह भंडारी (वय ६०) अजूनही भाड्याच्या घरात राहतात, तरीही फडी व पेन्शन मधून जमा झालेले दहा लाख रूपये पीएम केअर्स फंडास दिले. वडील स्वातंत्र्य सेनानी होते. देवकी देवी तुम्हाला सांष्टांग दंडवतच
    उत्तराखंड देवभूमी ऐवजी ” देवीभूमी” म्हटले पाहिजे. उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्याच्या गौचर गावात देवकी देवी राहतात. पती रेशम विभागात कार्यरत होते. स्वर्गवासी आहेत.
    गौचर गाव महिलांच्या दातृत्वासाठी भविष्य काळात प्रसिद्ध होईल. कारण याच गावातील शांतीदेवी गुसांई यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी एक लाख तर, कमला देवी यांनी वयाच्या सत्तावण्णाव्या वर्षी पती आणि मुलाचा मृत्यूचे दु:ख बाजूला ठेऊन दीड लाख रूपये करोना लढ्यासाठी दान केले आहेत.
    देवकीदेवी एकट्या राहात असूनही त्यांनी भारत वर्षास परिवार मानला. कर्ण व बळीराज्याचे दातृत्व आपण पुस्तकात वाचतो, पण साक्षात दहा लाख जमा पुंजी दान करून दाखवून दिले आहे. देवकीदेवी यांनी काही मुलांना दत्तक घेऊन त्यांचा उच्च शिक्षणापर्यंतचा सर्व शिक्षण खर्चही केला आहे.
    उत्तराखंडचे मान. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी गौचरच्या तिन्ही महिलांनी पंतप्रधान केअर्स फंडास करोना विरोधातील लढ्यासाठी दिलेल्या मदतीमुळे भारावून जाऊन पुढील गौरव उद्गार काढले, “देवभूमी करोनापासून मुक्त व्हावी म्हणून डोंगरातील महिलांनी वैश्विक संकटामुळे देश आर्थिकदृष्ट्या संकटात असताना निस्वार्थी भावनेने केलेल्या मदतीमुळे त्याग आणि दान ही भारतीय संस्कृती मूल्ये पुनर्जिवीत झाली आहेत. देशासाठी ही घटना प्रेरणास्रोत्र ठरणारी आहे.
    देवकीदेवी यांचे दिवंगत वडील स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते. देशप्रेम, देशाभिमान त्यांच्या नसानसात ठासून भरला आहे.
    नवऱ्याची मिळणारी पेन्शन म्हातारपणासाठी साठवली होती. करोनाच्या संकटामुळे लोकांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांनी मदतीचा निर्णय घेतला व गौचर भारतीय स्टेट बँकेत दहा लाखाचा धनादेश दिला.
    देशाचे महामहिम राष्ट्रपती व देशाचे प्रधानमंत्री यांचेसह अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
    माझ्या सारखे लोक मी, माझे कुटुंब, माझी मुले-मुली, माझा what’s app ग्रुप यामध्ये आनंद घेत असताना, चर्चा करत असताना, वितंडवाद करत असताना या महिला समाजाचा विचार करून भरभरून मदत करत आहेत. या देशाच्या देवभूमीतील “देवींना” सांष्टांग दंडवतच

देवकी देवी यांनी दहा लाख रूपये करोना विरोधातील लढ्यासाठी दिल्यानंतर काही दिवसांनी मोबाईलवर फोन करून तुमचे ATM कार्ड बिघडले असून तुम्ही कार्डचा नंबर सांगा. सुरू करतो म्हणून नंबर सांगितल्यावर ATM मधील ४७,७०० रूपये काढून घेतले हे देशाचे दुर्देव्य आहे. देवकी देवींना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अज्ञाता विरूद्घ गुन्हा नोंद करावा लागला
दहा लाख दान केल्यावर उर्वरित सर्व ४७,७०० रूपये रक्कम या देशातीलच हरामखोराने लांबविली याला काय म्हणावे???
देवकी देवी तुमची क्षमा मागतो. तुमचे पैसे लांबविणारे भामटे लवकर सापडू देत. तुम्हाला परमेश्वर आरोग्यदायी दीर्घायुष्य देऊ दे ही महालक्ष्मीचे चरणी प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया संपत गायकवाड (माजी सहाय्यक शिक्षण संचालक) यांनी व्यक्त केली

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started