
पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
ओझर येथे कोरोना महामारी निवारणार्थ १०८ कुंडात्मक विश्वशांती यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने बाबाजी परिवाराकडून सनातन विद्या फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयजी रत्नाकर तसेच सरचिटणीस भूषणजी रत्नाकर यांचे विशेष सत्कार करण्यात आला याप्रसंगी विश्वशांती सोहळ्याचे प्रधान आचार्य विलासजी कुलकर्णी उपस्थित होते. विशेष म्हणजे याप्रसंगी जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी स्वामी १००८ महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांचे प्रत्यक्ष भेट व आशिर्वाद घेण्याचा योग आला. बाबाजी परिवाराचे मनःपूर्वक आभार.