प्रतिनिधी बिपिन गायकवाड कोपरगाव-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी संध्याकाळी खांबेकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी खांबेकर यांच्या पत्नी जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस मीनल खांबेकर यांच्यासह दोन मुलं व दोन मुली यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की
स्व. अशोक खांबेकर यांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडले खांबेकर यांनी श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त व अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व ज्येष्ठ पत्रकार म्हणून जिल्ह्यासह त्यांचा परिचय होता तसेच पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळविला होता समाजासह अनेक क्षेत्रात पूर्ण यश मिळवले होते त्यांच्या जाण्याने कोपरगाव तालुक्या सह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात उत्तम पत्रकार तसेच राजकीय अभ्यासक हरपला अशोक खांबेकर यांचे अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारितेत मोठे योगदान आहे पीटीआय चे पत्रकार म्हणून देखील अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे ते श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त पदी असताना त्यांनी अनेक गोरगरिबांना मदत केली काही ना मोफत उपचार देऊन तर काहींना नोकरी लावून दिल्या राज्यासह देशभरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती सोबत त्यांचे रोजचे भ्रमणध्वनीवर बोलणे असायचे शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून जीवन जगले.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की अशोक खांबेकर आमचे काँग्रेसचे निष्ठावंत व कोपरगाव तालुक्याचे नेते होते सातत्याने त्यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विचारांची सेवा केली आहे एक उत्साही आनंदी व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे विकासाचा नेहमीच विचार करणारे व संघटनात्मक विचार करणारे अशा प्रकारचे त्यांचे नेतृत्व होतं त्यांच्या जाण्याने कोपरगाव तालुक्यात काँग्रेसमध्ये व समाजामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे असे थोरात शेवटी म्हणाले या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे तालुका काँग्रेसचे विष्णुपंत पाडेकर महिला काँग्रेस उपाध्यक्ष अॕड.शितल देशमुख महिला शहराध्यक्ष रेखाताई जगताप तालुका शहर चिटणीस ज्ञानेश्वर भगत उपशहर अध्यक्ष काँग्रेसचे अक्षय अंग्रे तालुका कार्याध्यक्ष सागर बारहाते राजूभाई पठाण निरंजन कुडेकर जय कदम अश्फाक सैय्यद दादा आवारे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Categories
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खांबेकर कुटुंबीयांचे केले सांत्वन