Categories
इंदापूर

पुणे जिल्हा एसटी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन पदी नितीन देवकर -पाटील यांची बिनविरोध निवड

इंदापूर एसटी आगाराला पहिल्यांदाच मान

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर( प्रतिनीधी) :

इंदापूर : पुणे जिल्हा एसटी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन पदी नितीन देवकर -पाटील बिनविरोध निवड झाल्याबद्दल इंदापूर आगारातील कर्मचारी यांच्याकडून पाटील यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रा. कृष्णाजी ताटे सर उपस्थित होते तर आगार प्रमुख मेहबूब मनेर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्रा. कृष्णाजी ताटे सर व मेहबुब मनेर यांच्या हस्ते नितिन देवकर – पाटील यांचा हार ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . तसेच इंदापूर आगरामार्फत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे इंदापूर आगाराचे सचिव बाळासाहेब फाळके व विभागीय अध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा . कृष्णाजी ताटे सर यांनी नितीन देवकर यांना सोसायटी मार्फत कामगारांच्या अडचणीच्या काळात वेळेत मदत देण्याची मागणी केली व सोसायटीचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा केली. यावेळी आगार प्रमुख मेहबूब मनेर , वाहतूक नियंत्रक दशरथ तोरसकर , विक्रम चंदनशिवे, मिट्टू खाडे , विजकुमार गवळी ,अनिल शिंदे यांनी नितीन देवकर- पाटील यांना शुभेच्छा दिल्या .
याप्रसंगी नूतन चेअरमन नितीन देवकर – पाटील म्हणाले महाराष्ट्र एस. टी.कामगार संघटनेचे जनरल सेक्रिटरी हनुमंत ताटे ,अध्यक्ष संदीप शिंदे , विभागीय सचिव दिलीपजी परब , विभागीय अध्यक्ष मोहन जेधे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार व आपल्या आगारातील सर्व एसटी कर्मचारी वर्ग यांचे वेळोवेळी मिळालेले प्रेम व आशिर्वाद यामुळेच आज आपल्या इंदापूर आगाराला एसटी सोसायटीचे चेअरमन पदाचा मान मिळाला.
इंदापूर आगाराच्या सहकार्यामुळे ही सुवर्णसंधी मिळाली असून सभासदाच्या अडीअडचणी संबंधित सर्वोच्च प्राधान्य जाईल असे त्यांनी सांगितले. सोसायटी बद्दल बोलताना पुढे म्हणाले, ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे विभाग या संस्थेची स्थापना १९६० रोजी झाली असून सोसायटी ला ६० वर्षे पूर्ण झाली असून ६० वर्षात मध्ये ही संस्था सेवेचा वसा घेऊन यशस्वीरित्या वाटचाल करत आहे .या संस्थेची पारदर्शी व सुस्तिम सेवा रा. प.कामगारांच्या नेहमीच पसंतीस उतरलेले आहे. संस्थेचे पहिले चेअरमन १९६० ते १९६२ पर्यंत एम. एन .संगम होते.तेव्हापासून आजपर्यंत संस्थेची वाटचाल प्रगतिपथावर आहे . त्याप्रमाणे संस्थेचे सतत अँडिट ‘अ’ वर्ग मिळत असून संस्थेच्या स्वारगेट, बारामती, राजगुरूनगर शाखेद्वारे सेवा दिली जाते.
संस्थेचे सभासद २२६२ असून वसूल भागभांडवल रु.८ कोटी ५० लाख आहे व गंगाजळी ४ कोटी ७२ लाख असून इमारत निधी ५६ लाख आहे. गुंतवणूक रु.९ कोटी ५० लाख असून सभासद ठेवी ५ कोटी ७७ लाख आहे. अशीही माहिती यावेळी इंदापूर एसटी आगाराचे नूतन चेअरमन नितीन देवकर – पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत खरात व महेश जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन शांताराम जगताप यांनी केले


Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started