

भोकर तालुका प्रतिनिधी:दता बोईनवाड
भोकर:दि.28.वंचित बहुजन आघाडी भोकर नगरपरिषदेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा मराठवाडा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष तथा पक्षनिरीक्षक दीपक डोके यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली.
भोकर येथील संगम फंक्शन हॉल मध्ये रविवार दि.27 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते एल.ए.हिरे हे होते.प्रथम प्रास्ताविक नवनिर्वाचित वंचित बहुजन आघाडीचे भोकर ता.अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर अध्यक्षपदाची धुरा टाकली तालुक्यात पक्ष संघटना बांधणीसाठी जोमाने कामाला लागणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना दीपक डोके म्हणाले राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे तमाम वंचित घटकांना न्याय देण्यासाठी सतत धडपडत असतात एकेकाळी भोकर मतदार संघात भारिप बहुजन महासंघाला चांगले दिवस होते अल्पशा मताने बहुजन उमेदवारांचा पराभव झाला पक्षाची पुनर्बांधणी करून कार्यकर्त्यांनी भोकर नगरपालिका ताब्यात घेतली पाहिजे त्यासाठी जोमाने लागावे.
यावेळी बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भीमराव दुधारे म्हणाले भोकर नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता असून नगरपालिका भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे.धनशक्तीच्या जोरावर सतेत आलेल्याना खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागून निवडणुकीमध्ये आव्हान निर्माण करावे लागणार आहे.
यावेळी नांदेड शहर वंचित आघाडीचे महासचिव गौतम कापुरे,इजि.राज अटकोरे,भारिपचे माजी अध्यक्ष सुभाष तेले, तालुका वंचित आघाडीचे महासचिव बालाजी आनंतवाड, सुनील कांबळे किनीकर,शेख शबीर आदींनी विचार मांडले अध्यक्षीय समारोप करताना हिरे म्हणाले एकेकाळी भोकर मतदार संघात भारिप बहुजन महासंघाचा दबदबा होता.बहुजन मतदारांनी आम्हाला भरभरून मतदान केल्याने विधानसभेचे उमेदवार तीन वेळा दुसऱ्या क्रमांकावर ह़ोते भोकर ग्रा.प.वर सता आली जि.प.,प.स.चे उमेदवार ही निवडूण आले होते 2005 नंतर भारिपला गळती लागली होती.१डिसेंबर २०१८ला झालेल्या भिमा कोरेगाव दंगल प्रकरणात बाळासाहेबानी चांगली भुमिका घेतल्यानंतर जनता त्यांच्या पाठीशी एक वठली होती लोकसभेला चांगले मतदान झाले विधान सभा निवडणूकीत मात्र मतदान घटले,कार्यकर्ते एक दिलाने काम केले. मतदारसंघात पक्षाची बांधणी करणे गरजेचे असल्याचे सांगून नगरपालिका निवडणुकीमध्ये समविचारी पक्षासोबत यूती करूणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद एडके,विजय मोरे,माणिक जाधव,दत्ता शिरवळकर,दता गटुवाड,सम्यक चौदंते,बालाजी बाबळे,प्रशांत शहाणे, पूजा बनसोडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.आभार गजू ढोले यांनी मानले.पक्ष निरीक्षक दीपक डोके,हिगोली जिल्हा वंचित ब.आघाडीचे अध्यक्ष वसीम देशमुख यांनी शहीद प्रफुल नगर,महात्मा फुले नगर समता नगर,शेख फरीद नगर,अशा अनेक वॉर्डांमध्ये भेटी देवून नागरिकांचे मते आजमावून घेतली.