
नाशिक शहर प्रतिनिधी सुनिल बेलदार
नाशिक दि 26 डिसेंबर : नाशिक महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांत चांगलाच वाद नाशिक शहरातच चांगलाच रंगला आहे. नाशिक शहराचे नवनियुक्त शिवसेनेचे महानरप्रमुख श्री सुधाकर बडगुजर यांच्या अभिनंदनाच्या फ्लेक्सवर भाजपच्या आमदारांना सभामंडप व ग्रीन जीम करणा-यांनी उड्डानपुलाचे श्रेय घेऊ नये असा टोमणा मारला आहे. सिडकोतील त्रिमूर्ती चौकात लागलेल्या फ्लेक्सची शिवसेना- भाजपतील वादाचे प्रतिक म्हणून चांगलीच चर्चा आहे.
नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून सिडकोतील उड्डाणपुलावरून ” राजकीय श्रेयवाद ” पेटलेला असतानाच सिडको परिसरात ठीक- ठिकाणी शिवसेना महानगरप्रमुख श्री सुधाकर बडगुजर यांच्या समर्थकांनी लावलेले काही वादग्रस्त फलक झळकताना दिसत आहेत. या फलकाच्या आडून सरळ सरळ नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या भाजप आमदारांना टार्गेट केले आहे. त्यांच्यावर निशाणा साधण्यात आल्याचे पहायला मिळत आहे . त्यामुळे श्रेयवादाचे हे राजकीय वातावरण सध्या तरी काही करता क्षमण्याची चिन्हे नाहीत.
शिवसेना- भाजपचा हा वाद भविष्यात “शिवसेना महानगरप्रमुख विरुद्ध नाशिक पश्चिमच्या भाजपा आमदार सीमा हिरे” यांच्यात रंगणार हेच यातून दिसतेय. या वादग्रस्त फलकावर पुढील काही ओळी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक व वाहनधारकाचे लक्ष वेधून घेत आहे . “पंख नसणाऱ्यांनी उडण्याची स्वप्नं पाहू नये, फक्त ग्रीन जिम आणि सभामंडप बनवणा-यांनी उड्डाणपुलाचे श्रेय घेऊ नये” शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पाठपुरावा करून त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौक उड्डाणपुलाला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल हार्दिक आभार! अशा आशयाचे टिका करणारे फलक सध्या शहरातील महापालिका निवडणुकीताल शिवसेना विरुद्ध भाजप या राजकीय लढाईचे प्रतिक बनले आहेत. अनेक ठिकाणी हे फलक लागल्याने भाजप समर्थकांच्या डोळ्यात मात्र ते खुपत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या फलकांना भाजप काय उत्तर देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
….