
( हिंदसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )
इंदिरा गांधीच्या काळात कामगारांचा दीर्घकाळ चाललेला संप इंदिरा गांधींनी चिरडून टाकला होता. या संपामुळे कामगार देशोधडीला लागला. कामगार चळवळीवर त्याचे फार मोठे परिणाम झाले. कामगारांची लढण्याची हिमत च नष्ट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सरकारी कंपन्या बंद होऊन त्यांचे खाजगीकरण करण्याचा जोरदार सपाटा सुरू आहे. कामगारांच्या आंदोलनांना कोणत्याही मिडीयामधून, वृत्तपत्रांतून वाचा फोडली जात नाही. वृत्तपत्रे, मिडीया मोदींचे गुलाम झाले आहेत. त्यामुळे सरकारी कंपन्यातील कामगार देशोधडीला लागला आहे. आता देशोधडीला लागण्याची शेतकऱ्यांची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या संपाला २८ दिवस उलटून गेले आहेत. तरी देखील, नरेंद्र मोदी संप मिटवण्यासाठी कोणत्याही हालचाली करताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फुटू नये, यासाठी संसदेचे अधिवेशन रद्द करण्याची पाळी नरेंद्र मोदींवर आली आहे. नरेंद्र मोदी यांचे विचारवंतांशी काहीही देणे घणे नाही. शेतकरी आंदोलन मिटविण्यासाठी कोणाबरोबरही चर्चा काढण्यास, माघार घेण्यास ते तयार नाहीत. नरेंद्र मोदींच्या या अहंकारामुळे कामगार वर्गाबरोबरच शेतकरीही देशोधडीला लागणार आहे.