Categories
शिरसगाव

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधत देवदैठण येथे रक्तदान शिबिर संपन्न, रक्तदान शिबीरास उत्फुर्त प्रतिसाद

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान , रक्तदान म्हणजे जीवनदान “
देवदैठण

(हिंदुसम्राट शिरसगाव बोडखा प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )
देवदैठण : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीयांची जयंती व सुशासन दिनाचे औचित्य साधत श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील जाणता राजा प्रतिष्ठाण, वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठाण व नगर येथील जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
महान तपस्वी दधिची ऋषी यांनी पुरातन काळात आपल्या अस्थींचे दान दिले . त्यापासून देवांनी बनवलेल्या अस्त्राने वत्रासुराचा वध करण्यात आला . हा दान देण्याचा वारसा दैठणकरांनी जोपासताना दधिची आश्रमात तब्बल १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले .
माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ, उद्योजक वसंत बनकर, सदस्य निलेश गायकवाड, सदस्य अनिल बनकर , डॉ.सुशांत पारनेरकर ,डॉ.वसंत झेंडे, वसुंधरा फाउंडेशचे अध्यक्ष सागर बनकर , चित्रपट कलाकार संदीप बोरगे सर यांच्या उपस्थित रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले.
विद्याधामचे क्रीडा शिक्षक संदीप घावटे सर यांनी सर्वात प्रथम रक्तदान केले . तर १०० वा रक्तदाते ठरले ते सोमनाथ कौठाळे .
प्रशांत ढवळे , कृष्णराज वायदंडे यांनी सपत्नीक रक्तदान केले . रविवारी विवाह संपन्न होणाऱ्या संकर्ष आहोळ व गणेश बनकर या नवरदेवांनी सुद्धा रक्तदान केले . यावेळी ५५ वर्षीय महिला मंगल सुखदेव बनकर , कल्पना ढवळे ,मिना वायदंडे यांनीही रक्तदान केले .साईकृपा कारखान्याचे जनरल मॅनेजर आर .टी . यादव यांनी सुद्धा रक्तदान केले .
कोरोना संकटकाळात १०० रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.
रक्तदात्यांना विमा प्रतिनिधी कालिदास बनकर यांनी दिनदर्शिकेचे वाटप केले . ग्रा.सदस्य रवींद्र ढवळे ,संदीप भालेकर व गणेश बनकर यांच्यावतीने अन्नदान करण्यात आले .
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ ,सागर बनकर , सुधीर ढवळे , तुषार वाघमारे , संदीप बोरगे , चतुर्भुज कौठाळे, धनंजय शिंदे , अमोल कौठाळे , संकेत अलभर , ज्ञानेश्वर बनकर , आकाश धावडे , रोहीत कौठाळे, सुजय धोत्रे , विकास धोत्रे , परवेझ मन्यार , किशोर बनकर , अमर डेंगळे ,अनिकेत धोत्रे, संचित उल्हारे, प्रतिक बनकर, यश ढवळे , सुयोग धोत्रे ,करण शिंदे , सादिक मन्यार , भूषण टकले , नागेश धोत्रे , आकाश भालेकर , अनिकेत जाधव ,जाणता राजा प्रतिष्ठाण व वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठाणचे सदस्य यांनी परीश्रम घेतले .

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started