Categories
कोपरगाव

सरपंच कसा असावा हे एकदा वाचा नंतरच आपला निर्णय घ्या

कोपरगाव हिंदूसम्राट तालुका प्रतिनिधी बिपिन गायकवाड –

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या असून ग्रामपंचायतीच्या सार्वगिण विकासासाठी लोकप्रतिनिधी योग्य गरजेचे आहेत सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य प्रमुख हा लोकाभिमुख असेन असे गरजेचे आहे लोकप्रतिनिधी गावांमधील लोकांमध्ये भांडण लावून स्वतःची पोळी भाजणारा नसावा गावाचा होणारा सरपंच गावात राहणारा असावा जेव्हा गावाला अडचण असेल तेव्हा वेळेवर मदत करणार असावा जर गावामध्ये भीषण दुष्काळ पडला असताना शासनाकडून लोकांना पाण्याची ची व्यवस्था करणार असावा गावाच्या विकासासाठी आलेल्या 14 वा वित्त आयोग निधी पेस निधी लोकहितासाठी वापरणारा असावा शासनाच्या योजना लाभार्थीनां फसवून पैसे उकळून पुन्हा वाटून खाणारा नसावा एम आर जी एस मधून मिळालेल्या विहिरीच्या लाभार्थी कडून कमिशन घेणार नसावा ग्रामपंचायत सदस्य आपल्या वार्डातील समस्याची जाणीव असणारा आणी लोकांचे प्रश्न सोडवणारा असावा गावात मंजूर झालेल्या विविध सरकारी योजनेची काम अर्धवट करुन पूर्ण बिल उचलणारा आणी शाळेतील मुख्याध्यापकाला सोबत घेऊन धाब्यावर जाणारा नसावा गावातील सर्व पदे आपल्याच घरात ठेवणारा नसावा गावातील सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणारा असावा सरपंच आणि प्रशासन एखादा सामान्य नागरिक ग्रामपंचायत कार्यालय कामानिमित्त गेल्यावर त्यांच्या बरोबर विनम्रपणे बोलणारा असावा त्याच्या समस्या काय आहे ते जाणून घेणारा असावा गावातील घनकचरा गटारी रस्ते याचे नियोजन करून स्वच्छ ठेवणारा आणि प्रशासनावर वचक ठेवणारा असावा कायम वरवर गोड गोड गप्पा मारुन हात हलवून फसवणारा तर अजिबात नसावा जवळच्या व्यक्तिची कामे करणारा नसावा सर्व समाजातील लोकांची कामे करणारा असावा सरपंच झाल्यावर फक्त आपल्याच पॅनलच्या लोकांची कामे करायची आणि विरोधी पॕनलच्या लोकांची कामे करायची नाही असा सरपंच नसावा सरपंच झाल्यावर फक्त आपल्या पॅनलच्या लोकांची कामे करायची आणि विरोधी त्यांच्या लोकांची कामे करायची नाही असा सरपंच नसावा सरपंच झाल्यावर कोणत्याही प्रकारचे राजकारण नकरता समाजातील सर्व घटकांना बरोबर घेवुन काम करणारा असावा गावातील काही रिकाम टेकडे गुंड प्रवृत्तीचे लोकांना सोबत घेवुन आपल्या विरोधाकांविरोधित गावातील आपल्या पेक्षा सभ्य चांगल्या वरचड व्यक्ति विरुध्द षडयंत्र रचणारा नसावा तु यांच्यात राहातो त्यांच्या सोबत फिरतो तुला बघुन घेईन मी तुला मदत केली होती अशी उपकाराची धमकीची भाषा करणारा नसावा दारु पाजुन तरुणांनांना बिघडवणारा व फक्त मतदाना साठी वापर करणारा नसावा ग्रामपंचायत मधुन कमवलेल्या पैशातुन लोकांना मटन दारु पाटर्या देणारा नसावा गावात लंग्न सोहळा , अंत्यविधी व धार्मीक सोहळ्यास सहभागी असताना चमचेगिरी करुन श्रेय लाटणारा नसावा गावातील आरोग्य केंद्राकडुन पैशाची मागणी करणारा नसावा गावासाठी खरेदी केलेल्या एल.ई.डी बल्ब खरेदीत कमिशन खाणारा नसावा गावाला मिळालेल्या तंटा मुक्त गावाचे बक्षिस भ्रष्टाचार करुन खाणारा नसावा गावात निवडुण येण्यासाठी लोकांना पैशे वाटुन पाटर्या देऊन निवडुन येणारा नसावा गावात पहिल्यांदा निवडुन आल्या नंतर लबाडीने सरपंच झाल्यावर पुढे जाऊन जिल्हापरीषद सदस्य बघण्याचे स्वप्न पाहणारा तर अजिबात नसावा.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started