( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )
दिनांक 24 डिसेंबर, 2020 रोजी बॅरिस्टर नाथ पै.शिक्षण प्रसारक मंडळाच्या विक्रोळी विद्यालयात ‘ प .पू . साने गुरुजींची जयंती ‘मोठ्या उत्साहात साजरी केली. संस्थेचे अध्यक्ष श्री. अजयकुमार चोपडेकर यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध लेखक ,कवी, नाटककार व टीव्ही स्टार श्री. राजीव तांबे हे उपस्थित होते.मुलांमध्ये रमणारे श्री. राजीव तांबे यांनी त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले . जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चुका करा ,पण त्या उगाळत बसू नका तर काय चुकले ते शोधून तिथे लक्ष केंद्रित करा, सुधारणा करा आणि पुढे जा.आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन हे यश प्राप्तीचे मूलमंत्र आहेत. अभ्यासाचे वेळापत्रक न करता अभ्यासपत्रक तयार करा व त्याप्रमाणे अभ्यास करा. तसेच स्वतःला बदलवायचे असेल तर प्रथम कृती बदला,विचार बदला, भाषा बदला प्रत्येक गोष्ट अंतर्मनात ठसवा म्हणजे ती प्रत्यक्षात साकार होईल .लॉकडाऊन मुळे मरगळलेले आमचे विद्यार्थी कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्साही झाले. त्यांनी अनेक प्रश्न पाहुण्यांना विचारले. पाहुण्यांनी ही आवडीने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली . खरोखरच ते आमच्या विद्यार्थ्यांचे आज सानेगुरुजी झाले. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक सचिव मा. श्री. गणेश बटा सर हे उपस्थित होते . सर्व शाळा समूहाचे मुख्याध्यापक श्री .येजरे सर ,श्री शेळके सर ,सौ चोपडेकर मॅडम , सौ. मनस्वी कोयंडे व कु शैला दीक्षित मॅडम उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका सौ .तरे मॅडम यांनी केले.पाहुणयांचा परिचय शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ .अनिता जाधव मॅडम यांनी केले. पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप माध्यमिक विभगाचे मुख्याध्यापक श्री. भिवा येजरे यांनी केले.अशी माहिती
गणेश हिरवे यांनी दिली.