- कोल्हापूर- सुभाष भोसले
उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील गौचर परिसरातील दुसरी दातृत्ववान दुर्गा. पती कमलसिंह नेगी शिक्षण विभागात परियोजना अधिकारी होते. त्यांचे निधन झाले आहे. पती ग्राम पंचायत झिरकोटीचे रहिवासी होते. चार वर्षापूर्वी दुर्घटनेत दोन्ही मुलांचे अकाली निधन झाले आहे. कमला देवी स्वत: राजकीय इंटर कॉलेज लंगासू येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात.
गौचर क्षेत्रातील देवकीदेवी भंडारी यांनी दहा लाख तर शांतीदेवी गुंसाई यानी एक लाख करोना विरोधातील लढ्यासाठी दिले होते. त्यांचाच आदर्श समोर ठेऊन कमलादेवी नेगी यांनी दीड लाख रूपये पंतप्रधान केअर्स फंडास दान केले आहेत. गौचर येथील भारतीय सेंट्रल बँकेत त्यांनी धनादेश सुपूर्द केला.
कमलादेवी नेगी यांनी करोनामुळे बेरोजगारी व उपासमारीमुळे जनता होरपळून निघत असल्याने आपण दान दिल्याचे सांगितले. देवभूमीतून करोना लवकर नाहिसा व्हावा व जनजीवन पूर्वपदावर यावे असे कमलादेवी यांना वाटते.
आयुष्याच्या उत्तरार्धात नोकरीचे अखेरचे वर्ष असताना आयुष्यभर साथ दिलेला नवरा गेला आहे. दोन्ही मुलांचे दुर्घटनेत निधन झाले आहे. एकाकी आयुष्याची संध्याकाळ असताना समजातील दु:ख पाहून मदतीचा हात पुढे करणे साधी सोपी गोष्ट नाही. कमला देवी तुम्हाला आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे. दु:खाचा डोंगर कोसळला तरी रक्तातील दातृत्व उफाळून आले त्या दातृत्वास सांष्टांग दंडवत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कमलादेवी यांचे भरभरून कौतुक केले. कमलादेवी यांची कृती समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
समाज हेच कुटंब मानणाऱ्या कमलादेवी तुमचा अभिमान वाटतो.
संपत गायकवाड
(माजी सहाय्यक शिक्षण संचालक)
