कोल्हापूर- सुभाष भोसले
डॉ संकेत मेहता भूलतज्ञ सूरत ( गुजरात) स्वत: ऑक्सिजनवर उपचार घेत असताना ICU मध्ये ७१ वर्षांच्या पेशन्टला ऑक्सिजन ट्यूब लावायला डॉक्टर लवकर न आल्याने डॉ मेहता यांच्यातला देवदूत जागा झाला त्यांनी स्वत:चा ऑक्सिजन मास्क काढून रूग्णाला ऑक्सिजन ट्यूब टाकली. बावीस मिनीटे डॉ मेहता यांना स्वत:ला ऑक्सिजन न मिळाल्याने फुफ्फुसावर गंभीर परिणाम होऊन ९६ दिवस दवाखान्यात राहावे लागले. चेन्नई येथे जाऊन केलेल्या उपचाराचा खर्च साठ लाख (६०,००,०००) रुपये आला.
डॉ संकेत मेहता हे सूरत येथील हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञ म्हणून सेवा बजावत आहेत. डॉ मेहता यांना करोनाची लागण होऊन त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने ते स्वत: ऑक्सिजनवर उपचार घेत होते. ICU मध्ये ७१ वर्षीय रुग्ण उपचाराखाठी आले. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. तात्काळ ऑक्सिजन लावणे आवश्यक होते. डॉक्टरांना यायला उशीर होतोय हे लक्षात येताच रूग्णाचा जीव वाचावा म्हणून डॉ मेहता यांच्यातील देवदूत जागा झाला. त्यांनी आपला ऑक्सिजन मास्क काढून आलेल्या रूग्णास व्हेंटीलेटरवर ठेऊन ट्यूब टाकली. हे सर्व करेपर्यंत २२ मिनीटे डॉ मेहता विना ऑक्सिजन मास्क होते. याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन फुफ्फुस खराब झाले. फुफ्फुस प्रत्यारोपन करण्याची शक्यता निर्माण झाली.
फुफ्फुस प्रत्यारोपन करण्यासाठी डॉ मेहता यांना चेन्नई येथे एअर अॅम्बुलन्स ने हलविले. चेन्नई येथे फुफ्फुस प्रत्यारोपन न करता हॉस्पिटलमधील डॉक्टरांना बरे करण्यात यश आले. एकूण एक कोटी रूपये खर्च आला. पण हॉस्पिटलने साठ लाख रूपये बील केले. सुरत येथील डॉक्टर व डॉ मेहतांच्या मित्रांनी क्राऊड फंडींग सुरू केले, कारण हा प्रचंड कुवतीच्या पलिकडचा खर्च होता. सुरतच्या हॉस्पिटलमध्ये उपचाराचा खर्च माफ केला.
२२ दिवस व्हेंटिलेटरवर, ९६ दिवस हॉस्पिटलमध्ये, एकूण उपचाराचा खर्च ६० लाख रूपये भरून घरी आले. वॉकरचा आधार घेऊनच अजूनही चालावे लागते.
डॉ संकेत यांचे वय केवळ ३७ वर्ष आहे. रूग्णावर डॉक्टर लवकर न आल्याने आपला जीव धोक्यात घालून रुग्णावर उपचार करणे केवढ्या पडले? स्वत: ऑक्सिजनवर उपचार घेत असताना कोणीही दुसऱ्या रूग्णावर स्वप्नातही वा कल्पनेतही उपचार करणार नाही. तरीही डॉ मेहता यांनी धाडस केले ते त्यांना खूपच महागात पडले
डॉ संकेत मेहता यांना हॉस्पिटलचे बील साठ लाख म्हणजे प्रचंड आहे. लोकांनी जीव धोक्यात घालून उपचार केले म्हणून कौतुक झाले, वर्तमानपत्रांचे रकाणे भरून आले. टी व्ही चॅनलवर प्रशंसा झाली. आता मात्र त्यांना आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहे. सुरतबरोबर संपूर्ण देशासाठी नव्हे तर जगासाठी मिसाल बनलेले डॉ संकेत यांना सर्व स्तरातून मदत मिळावी ही परमेश्वराचे चरणी प्रार्थना.
रक्कम उभी राहील, आर्थिक संकट दूर जाईल पण तब्बेतीचं काय??बायको मुले, आई -वडील यांचं काय ??? डॉ संकेत मेहता तुम्ही परमेश्वराचे अवतार नव्हे तर परमेश्वरच आहात. देशाच्या वैद्यकीय इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरांनी लिहीले जाईल. डॉक्टर तुमच्या पायावर नतमस्तकच. तुम्हाला परमेश्वर आरोग्यदायी दीर्घायुष्य देऊ दे
जीवावर उदार होऊन सेवा बजावणाऱ्यासाठी ही गोष्ट शंभरवेळा वाचून विचार करण्यासारखी आहे. शेवटी सर्व स्वत:ला, पत्नीला, मुलांना व आई-वडील यांनाच निस्तरावे लागते.

संपत गायकवाड (माजी सहाय्यक शिक्षण संचालक)