Categories
कोल्हापूर हातकणंगले

सुभेदार राजेश सूर्यवंशी यांचा सेनादलातील सेवा निवृत्ती सोहळा मा.कॅप्टन गणपतराव घोडके यांच्या उपस्थित संपन्न

शिरोली गावचे सुपुत्र सुभेदार  राजेश आबासाहेब सूर्यवंशी यांनी सेनादलात सिग्नल रेजिमेंट मध्ये प्रामाणिकपणे 30 वर्षे देश सेवा केली .करत असताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिरोली येथे झाले.व त्यानंतर त्याचें मामा यांच्या प्रेरणेने मुळातच खिलाडू वृत्ती व देशसेवेने प्रेरणीत झालेले राजेश  1999 ला सेना दलामध्ये भरती झाले .भरती झाल्यापासून  भारत देशामधील विविध बॉर्डर वर सिग्नल रेजिमेंट या पदावर  काम केले .या वेळी पाकिस्तान , लढाख ,चीन ,दिल्ली ,जम्मू काश्मीर, व वाघा बॉर्डर वर प्रामाणिक पणे सेवा 30 वर्षे सेवा बजावली . श्री राजेश सूर्यवंशी यांची डिसेंबर महिन्यामध्ये सेवा निवृत्ती झाली असून त्या प्रसंगी विशेष असा गौरव सत्कार विश्ववारणा पब्लिक स्कूल (सैनिकी पॅटर्न )शाळेचे संस्थापक कॅप्टन गणपतराव घोडके यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा.संभाजी पाटील व श्री.शशिकांत खवरे (सरपंच, शिरोली) तसेच श्री.महेश चव्हाण ( माजी जि. प.सदस्य) ,श्री राजेश पाटील (हातकणंगले तालुका भाजप अध्यक्ष) या मान्यवरांनी आपल्या राजेश सूर्यवंशी यांच्या विषयीच्या देशभावना ,आठवणी व संस्कार याविषयीचे मनोगत व्यक्त केले.     
याप्रसंगी त्यांच्या आई श्रीमती शांताबाई सूर्यवंशी तसेच पत्नी सौ सुनीता सूर्यवंशी तसेच दै. सकाळचे मेकॅनिकल विभागाचे  त्यांचे भाऊ श्री .महेश सुर्यवंशी , तसेच त्यांच्या पत्नी , मुले व मुली, व पुतणे  , चुलते, बहीण ,दाजी व आत्या तसेच  श्री .शिवाजी पाटील (उद्योगपती) ,श्री सुरेश यादव (डे. सरपंच ),श्री प्रकाश कंवदाडे , श्री.अनिल खवरे , श्री विठ्ठल पाटील , श्री राजू यादव तसेच सूर्यवंशी व मित्र परिवार प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री राजेश येसुगडे यांनी केले. हा कार्यक्रम सतेज पाटील मल्टीपर्पज हॉल , बावडा या ठिकाणी दि .२३/१२/२०२० रोजी सायंकाळी 6 वाजता सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील आजी-माजी सेनादलातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started